शिवप्रहार न्यूज-सणासुदीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरात गावठी कट्टयासह एकाला पकडले; दोन जिवंत काडतुसही जप्त…

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरात गावठी कट्टयासह एकाला पकडले; दोन जिवंत काडतुसही जप्त…
श्रीरामपूर- आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने बेकायदशिर शस्त्रे कब्जात बाळगणारा एक आरोपी ३०,५००/ रु. कि. चा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुससह श्रीरामपूर येथून जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची कारवाई.
मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी दिनांक १४/०४/२०२२ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, भगवान महावीर जयंती, दिनांक १५/०४/२०२२ रोजी गुड फ्रायडे, दिनांक १६/०४/२०२२ रोजी श्री. हनुमान जयंती व दिनांक १७/०४/२०२२ रोजी इंस्टरसंडे या आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणारे किंवा विक्री करणारे आरोपींची माहिती काढून त्यांचे विरुद्ध कारवाई करणे बाबत श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सुचना दिल्या होत्या.
नमुद सुचनांचे अनुषंगाने पोनि / श्री. अनिल कटके, स्थागुशा अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथकाची नेमणुक करून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये सपोनि /सोमनाथ दिवटे, पोहेकॉ/मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, पोकॉ/सागर ससाणे, रविंद्र घुंगासे, रोहित येमुल, मेघराज कोल्हे व चापोहेकॉ/ उमाकांत गावडे असे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणारे आरोपींची माहिती घेत असतांना श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, एक इसम हा गावठी कट्टा व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी बीफ मार्केट, वार्ड नं. २ परिसर येथे येणार आहे. आता लागलीच गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि सो. यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना नमुद हकिगत कळवून आरोपीची खात्री करून कारवाई करणे बाबत आदेश दिले.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दोन पंचासह वाहनाने मिळालेल्या बातमीचे ठिकाणी बीफ मार्केट, वॉर्ड नं. २ श्रीरामपूर येथे जावून सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच एक संशयीत इसम बीफ मार्केट परिसरात फिरतांना दिसला. त्यावेळी पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेवून त्यास पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता १) अंजर इलीयाज शहा वय २२, रा. बीफ मार्केट जवळ, वॉर्ड नं. २, ता. श्रीरामपूर असे असल्याचे सांगीतले. त्यास त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतूसे असे एकूण ३०,५००/ रु. किं.चा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले. वरील नमुद इसम नामे १) अंजर इलीयाज शहा वय २२, रा. बीफ मार्केट जवळ, वॉर्ड नं. २, ता. श्रीरामपूर हा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोकों/२३८३ रविंद्र तुकाराम घुगांसे ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. २६८ / २०२२, आर्म ॲक्ट कलम ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहेत.
सदर कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.