शिवप्रहार न्यूज- बाभळेश्वर रस्त्यावर अपघातात तरुणाचा मृत्यू;श्रीरामपूर शहर पो. ठाण्यात अपमृत्यू दाखल…

शिवप्रहार न्यूज- बाभळेश्वर रस्त्यावर अपघातात तरुणाचा मृत्यू;श्रीरामपूर शहर पो. ठाण्यात अपमृत्यू दाखल…

बाभळेश्वर रस्त्यावर अपघातात तरुणाचा मृत्यू;श्रीरामपूर शहर पो. ठाण्यात अपमृत्यू दाखल…

 श्रीरामपूर- श्रीरामपूर -बाभळेश्वर रस्त्यावर नांदूर या गावच्या जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्तगाव येथे राहणारे बाबासाहेब पठारे,वय 37 वर्षे यांचे निधन झाले.बाबासाहेब पठारे यांना जखमी अवस्थेत लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वी बाबासाहेब पठारे मयत असल्याचे घोषित केले.

      त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपमृत्यू क्रमांक 25/2022 प्रमाणे नोंद घेण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लाला पटेल हे करीत आहेत.