शिवप्रहार न्यूज- अशोक पॉलिटेक्निक मध्ये आंतरविभागीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन…
अशोक पॉलिटेक्निक मध्ये आंतरविभागीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन…
प्रतिनिधी (अशोकनगर) : माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अशोक पॉलिटेक्निक महाविद्यालयात विविध आंतरविभागीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर स्पर्धेत खो-खो मध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करीत अटीतटीचा विजय मिळवित विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेत प्रथम वर्ष, मेकनिकल, कॉम्पुटर, सिव्हील, केमिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन या विभागातील संघानी सहभाग नोंदवला होता.
अंतिम फेरीत प्रथम वर्ष व मेकेनिकल विरुद्ध मध्यंतराला १० विरुद्ध ५ अशी ५ गुणांची विजयी आघाडी होती. त्यांच्या अमीर शेख व कृष्णा नाणेकर याने सहा मिनिटे २५ सेकंदाचे संरक्षण करीत आक्रमणात तीन गडी बाद केले. त्यांना महेश जाधव, रितेश येसेकर, निखील तांबे, संतोष कुमावत, साहिल अमोलिक, सर्फराज शेख यांनी चांगली साथ दिली. तर पराभूत संघातर्फे आकाश क्षत्रिय व कार्तिक वमने यांची खेळी आपल्या संघाचा पराभव टाळू शकले नाही. हा सामना प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने २ डाव ३ गुणांनी जिंकून आपले स्थान निश्चित केले. या विजयी संघाचे नेतृत्व प्रवीण खेमनर याने केले होते. त्यांच्या संघाना प्रा. रामेश्वर पवार व प्रा. प्रमोद म्हसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विजयाबद्दल संस्थेचे संस्थापक माजी आमदार भानुदास मुरकुटे,व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे,संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, सचिव सोपानराव राऊत, सहसचिव भास्कर खंडागळे, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे व कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्री मुरकुटे,कार्यकारिणी सदस्य विरेश गलांडे,ज्ञानेश्वर काळे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या स्पर्धेसाठी प्राचार्य अंजाबापू शिंदे व क्रीडा समन्वयक प्रा. सचिन कोळसे यांनी मार्गदर्शन केले. तर खो-खो समन्वयक म्हणून प्रा. मोहितकुमार गायकवाड, प्रा. अविनाश सरोदे व प्रा. अनिल चितळकर यांनी काम पाहिले.