शिवप्रहार न्यूज-अमृत जवान सन्मान योजनेमधून 72 वर्षापूर्वीचा बेलापुरातील रस्त्याचा वाद आला संपुष्टात…

शिवप्रहार न्यूज-अमृत जवान सन्मान योजनेमधून 72 वर्षापूर्वीचा बेलापुरातील रस्त्याचा वाद आला संपुष्टात…

अमृत जवान सन्मान योजनेमधून 72 वर्षापूर्वीचा बेलापुरातील रस्त्याचा वाद आला संपुष्टात…

 श्रीरामपूर,, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील माजी सैनिक विलास खर्डे यांच्या जमिनी कडे जाण्यासाठी 70 वर्षा पासून शिवार रस्ता होता परंतु संबंधित काही शेतकरी जाण्या-येण्यासाठी मनाई करत असत व शेजारील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले असल्याकारणाने रस्ता नामशेष होता त्यामुळे माजी सैनिका सह सर्वच शेतकऱ्यांना शेतीत अवजारे घेऊन जाणे व शेतमालाची वाहतूक करताना मोठी कसरत व त्रास होत असे म्हणून माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या संकल्पनेतील व राज्य शासनाने दखल घेतलेल्या अमृत जवान सन्मान योजनेअंतर्गत श्रीरामपूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार माननीय प्रशांत पाटील साहेब यांचेकडे अर्ज दाखल केला असता माननीय तहसीलदार साहेब यांनी बेलापूर खुर्द चे मंडलाधिकारी सी बी बोरुडे व तलाठी यांना आदेश पारित करून स्पॉट पंचनामा करून माजी सैनिकास तात्काळ न्याय देऊन अर्ज निकाली काढावा असा फतवा काढला.त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यभर माजी सैनिक ,वीर माता ,वीर पिता ,वीर पत्नी ,विधवा सैनिक पत्नी ,यांच्या विविध प्रकारच्या समस्या निवारण करण्याकरिता राज्यभर व्यापक पद्धतीचे कार्य करणारी त्रिदल सैनिक सेवा संघाचे नगर उत्तर विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार, तालुकाध्यक्ष संग्राम यादव यांच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करून माजी सैनिका सह सर्व शेतकऱ्यांसाठी दहा फूट रस्त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे गेल्या 72 वर्षांनंतर झालेल्या रस्त्यामुळे शेजारचे सर्व शेतकरी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

       हा रस्ता बनवण्यासाठी शेजारील सर्वच शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे आढेवेढे न घेता मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे त्याप्रसंगी नगर उत्तर विभागाचे मेजर कृष्णा सरदार तालुकाध्यक्ष संग्राम जीत यादव सेक्रेटरी सुनील भालेराव मेजर विलास खर्डे ,मेजर विलास जगताप, मेजर राजेंद्र तोरणे, सेवारत सैनिक विकास ओहोळ, राम पुजारी रस्ता बनवण्याकरिता सुदाम जोशी, मच्छिंद्र थोरात, सुनील थोरात ,बायजाबाई थोरात, विजयकुमार थोरात ,द्वारकानाथ कसब,े मच्छिंद्र पुजारी, संजय पुजारी ,राजेंद्र पुजारी ,सत्यभामा पुजारी ,बाबुराव जोशी जनार्दन पुजारी ,चंद्रकांत पुजारी ,मंगल वाघमारे या सर्व शेजारील शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा वाद-विवाद न घालता मोठे सहकार्य केले आहे याप्रसंगी पंढरीनाथ पुजारी, मारुती पुजारी, संपत पुजारी ,अक्षय जोशी, ज्ञानदेव पुजारी ,प्रदीप पुजारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.