शिवप्रहार न्यूज- संगमनेरात कत्तलखान्यावर कारवाई एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त...

शिवप्रहार न्यूज- संगमनेरात कत्तलखान्यावर कारवाई एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त...

संगमनेरात कत्तलखान्यावर कारवाई एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त...

 संगमनेर - संगमनेर येथील जमजम कॉलनीतील कत्तलखान्यावर नगर,श्रीरामपूर व संगमनेर पोलिसांनी मिळून छापा टाकला.या छाप्यामध्ये पाच कत्तलखान्यांवर कारवाई करण्यात आली.त्यात 62 लाख रुपयांचे 31 हजार किलो गोमांस व इतर मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.त्याची एकूण किंमत एक कोटी चार लाख 50 हजार रुपये इतकी आहे.

           वाहिद कुरेशी याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.पोलीस विभागाला यावेळी प्राणी कल्याण अधिकारी श्री.यतीन जैन यांनी सहकार्य केले.

             गेल्या काही वर्षातील हि सर्वांत मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे .