शिवप्रहार न्यूज- मुळा धरणात “डेड बॅाडी” सापडली…
मुळा धरणात “डेड बॅाडी” सापडली…
राहुरी (तालुका प्रतिनिधी) -मुळा धरणाच्या अथांग पाण्यात एका चाळीस-पंचेचाळीस वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. सदर मृतदेह हा अन्य ठिकाणी घातपात करून या धरण क्षेत्रात आणून टाकल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. नेमका हा घातपात की अपघात याचा तपास पोलीस करत आहेत
बारागाव नांदूर हद्दीत यांत्रिक बोटीच्या थडीपासून २५ ते ३० फूट अंतरावर मृतदेह पाण्यावर तरंगत होता. शनिवारी मासोमारी करणार्या आदिवासी तरुणांनी हा मृतदेह पाहिला. त्यांनी तात्काळ जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांना माहिती दिली. गाडे यांनी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मृत माहिती देऊन घटनास्थळी धाव घेतली. धरणात मासेमारी करणारे तरुण शशिकांत बर्डे, लखन हारदे,जालू माळी, ज्ञानदेव बर्डे यांच्या मदतीने पाण्यातील मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राहुरी येथे हलविला आहे.
मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू असुन राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.