शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील तरुणीचा खंडाळा शिवारात पाटात आढळला मृतदेह;नवऱ्याने घातपात केल्याचा नातेवाईकांचा गंभीर आरोप…

श्रीरामपुरातील तरुणीचा खंडाळा शिवारात पाटात आढळला मृतदेह;नवऱ्याने घातपात केल्याचा नातेवाईकांचा गंभीर आरोप…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सात मधील मोरगे वस्ती परिसरातील सुवर्ण पिंपळ जवळ राहणारी तरुणी वैशाली उर्फ कल्याणी धीरज पारोळकर ,वय 34 हिचा मृतदेह आज रविवार दिनांक 26 जून रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास खंडाळा भागातील रांजणखोल रोडच्या पाठीमागील अचानकनगर येथील पाटाच्या पुलाला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की,मयत तरुणी कल्याणी उर्फ वैशाली हिचा पती धीरज पारोळकर याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे मयत तरुणी वैशालीचे तिच्या पतीसोबत या कारणावरून वाद होत होते आणि या वादातूनच पती धीरज पारोळकर हा वैशाली हिला मारहाण करून तिचा राग करत होता. त्यामुळेच वैशाली हिच्यासोबत पतीकडून घातपात झाला असावा असल्याचा खळबळजनक आरोप वैशाली हिच्या माहेरच्या नातेवाइकांनी केला आहे.
आज सकाळी खंडाळा शिवारात पाटाच्या पुलाला हा मृतदेह आढळल्याने याबाबतची माहिती सतर्क ग्रामस्थांनी तात्काळ गावचे पोलीस पाटील कृष्णा अभंग यांना दिली.त्यांनी पुढे ही माहिती श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला पोचवली असून शहर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.
आता या प्रकरणात पती धीरज पारोळकर याच्यावर श्रीरामपूर शहर पोलिसांकडून नेमकी काय कारवाई होते याची वाट आम्ही पहात असल्याचे मयत कल्याणी उर्फ वैशालीच्या नातेवाईकांनी केली आहे.