शिवप्रहार न्यूज- लव जिहाद विरोधी मोर्चा काढला म्हणून शिवप्रहारवर गुन्हा दाखल;हिंदूंच्या मायलेकींचे रक्षण पण करायचे नाही का आता ? …
लव जिहाद विरोधी मोर्चा काढला म्हणून शिवप्रहारवर गुन्हा दाखल;हिंदूंच्या मायलेकींचे रक्षण पण करायचे नाही का आता ? …
श्रीरामपूर- युगप्रवर्तक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी मायलेकींचे रक्षण करण्याची शिकवण आपल्याला दिली.मग ती माय-लेक अठरापगड जातीतील कोणत्याही समाजाची असो.ही शिकवण शिवप्रहार प्रतिष्ठान संघटना आचरणात आणत आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील हिंदू समाजाची एक मुलगी ४० दिवसापासून एक लव जिहादी घेऊन पळून गेलेला आहे.यावर पोलिसांना तक्रार करून,अर्ज करून देखील मुलीचा शोध न लागल्यामुळे मुलीच्या परिवारासह शिवप्रहार प्रतिष्ठानच्या अठरापगड जातीच्या मावळ्यांनी काल श्रीरामपूर शहरात “लव जिहाद विरोधात महामोर्चा” काढला.म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात शिवप्रहार प्रतिष्ठानच्या प्रमुख मावळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
असाच मोर्चा गेला आठवड्यात गुजरात येथील पीडिता बिल्किस बानो हिच्यासाठी काढण्यात आला होता.मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील तहसिल,प्रांत,डिवायएसपी कार्यालयात ठिय्या धरण्यात आला.परंतु त्या मोर्चेकरांवर काही कारवाई करण्यात आली नाही आणि हिंदू मुलीसाठी लव जिहाद विरोधात मोर्चा काढला तर लगेच गुन्हा दाखल झाला. एक तर दोन्ही समाजातील मोर्चेकर्यांवर गुन्हा दाखल करायचा किंवा दोन्हीवर गुन्हा दाखल नाही करायचा. एका सामाजावर गुन्हा दाखल करायचा आणि दुसऱ्यावर नाही असे का?
सर्वांसाठी समान असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा हा दुटप्पी न्याय कशासाठी आहे? असा सवाल शिवप्रहार प्रतिष्ठान,हिंदू समाज,अठरापगड जातीच्या संतप्त मावळ्यांकडून करण्यात येत आहे.हिंदूंच्या कुटुंबातील अब्रूचे धिंडवडे निघाले आणि पोलिसांकडून योग्य कारवाई होत नसेल तरी काहीच बोलायचे नाही का? सगळे निमूटपणे सहन करायचे का ? याचे उत्तर गुन्हा दाखल करणार्यांनी द्यावे.