शिवप्रहार न्यूज- हिंदू मुलीसाठी पुकारलेल्या श्रीरामपूर-बेलापूर बंदला हिंदू समाजाकडून शंभर टक्के प्रतिसाद...
हिंदू मुलीसाठी पुकारलेल्या श्रीरामपूर-बेलापूर बंदला हिंदू समाजाकडून शंभर टक्के प्रतिसाद...
श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावातील एक 14 वर्षीय हिंदू मुलगी ही आयुब शेख या लव्ह जिहादीने गेल्या 25 दिवसांपासून पळवून नेलेली आहे. या मुलीचा शोध घेण्यासाठी “शिवप्रहार प्रतिष्ठान” तर्फे तीन ऑगस्ट रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर नऊ ऑगस्ट रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन वर शेकडो शिवप्रहार प्रतिष्ठानच्या मावळ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता.
तरी देखील ही हिंदू मुलगी न मिळाल्यामुळे आज सोमवार दिनांक 16 ऑगस्ट 2021 रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने “शिवप्रहार प्रतिष्ठान” श्रीरामपूर या बिगर राजकीय संघटनच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहर व बेलापूर गावात बंद पुकारण्यात आला होता. या बंदला श्रीरामपूर शहरातील मेन रोड, शिवाजी रोड, संगमनेर रोड, नेवासा रोड,बेलापूर रोड,गोंधवणी रोड व इत्यादी बाजारपेठेतील व्यापारी बांधवांनी व हिंदू समाजाने शंभर टक्के प्रतिसाद दिला.
परंतु वार्ड नंबर दोन मधून बंदला प्रतिसाद मिळाला नाही. तसेच बेलापूर गावातील एका “नकली हिंदूवादी” नेत्याने बंदला विरोध करण्यासाठी फोन फिरवले होते.परंतु हिंदू समाजातील व्यापार्यांनी या नकली नेत्याला किंमत दिली नाही.यावरून त्याच्या गावात त्याची लायकी त्याला समजली.
तरी “शिवप्रहार प्रतिष्ठान” श्रीरामपूरच्या वतीने पुकारलेल्या या बंदला सर्व हिंदू समाज, व्यवसायिक व व्यापारी बांधवांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
या हिंदू मुलीचा शोध घेण्यासाठी व श्रीरामपुर शहरातील भगव्याचे कार्य अविरतपणे चालू ठेवण्यासाठी “शिवप्रहार प्रतिष्ठान” हे संघटन अहोरात्र झटत आहे.