शिवप्रहार न्यूज -वडिलांनी “सतत मोबाईल खेळू नको” असे सांगितल्याने श्रीरामपूर परिसरातील 14 वर्षाच्या एकुलत्या एक मुलाने केली आत्महत्या

शिवप्रहार न्यूज -वडिलांनी “सतत मोबाईल खेळू नको” असे सांगितल्याने श्रीरामपूर परिसरातील 14 वर्षाच्या एकुलत्या एक मुलाने केली आत्महत्या

वडिलांनी “सतत मोबाईल खेळू नको” असे सांगितल्याने श्रीरामपूर परिसरातील 14 वर्षाच्या एकुलत्या एक मुलाने केली आत्महत्या...

श्रीरामपूर -श्रीरामपूर एमआयडीसीला लागून असलेल्या रांजणखोल गावामध्ये सतत रात्रंदिवस मोबाईल खेळणाऱ्या एकुलता एक चि. पुष्कर,वय 14 वर्षे याला त्याच्या वडिलांनी सारखा,सतत मोबाईल काय खेळतोस? असे बोलून खडसावले. त्यामुळे वडिलांच्या बोलण्याने नाराज होऊन पुष्करने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

      पुष्कर याने गळफास घेतल्याचे लक्षात येताच त्याच्या नातेवाईकांनी त्याला तात्काळ श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालय येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी पुष्कर हा उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.तरी सदर घटनेवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपमृत्यू क्रमांक 52/2021 फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 174 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

      या घटनेच्या ठिकाणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सानप यांनी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार श्री.साळवी हे करीत आहेत.

       आजच्या पिढीतील लहान मुलांना लागलेला मोबाईलचा नाद हा खुप मोठा चिंतेचा विषय झाला असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे.