शिवप्रहार न्यूज- मुळा धरणात बुडून चेतनचा मृत्यू…

शिवप्रहार न्यूज- मुळा धरणात बुडून चेतनचा मृत्यू…

मुळा धरणात बुडून चेतनचा मृत्यू…

राहुरी - राहुरी तालुक्यातील मुळा धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चेतन कैलास क्षीरसागर, वय 38 वर्ष ,राहणार -पाईपलाईन रोड,सावेडी,नगर या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

     याबाबत अधिक माहिती अशी की,नगर येथील हॉटेल व्यवसायिक चेतन क्षीरसागर हे त्यांच्या इतर 13 मित्रांसह रविवारच्या सुट्टीमुळे मुळा धरणावर पर्यटन-पोहण्यासाठी आले होते.त्यावेळी धरणात बुडून चेतन यांचा मृत्यू झाला.दरम्यान बराच वेळ चेतन यांचे यांचा मृतदेह सापडला नाही म्हणुन स्थानिक आदिवासी तरुण छबु पवार, विजय पवार ,इंद्रजीत गमे या पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी चेतन यांचा मृतदेह अथक प्रयत्नानंतर धरणाबाहेर काढला. 

         सदर घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तरी घडलेल्या घटनेवरून पर्यटन स्थळी जाताना तरुण पिढीने काळजी घ्यावी.