शिवप्रहार न्यूज - शिवपुतळ्यासंदर्भात मुख्याधिकारींना घेराव...

शिवप्रहार न्यूज -  शिवपुतळ्यासंदर्भात मुख्याधिकारींना घेराव...

शिवपुतळ्यासंदर्भात मुख्याधिकारींना घेराव...

श्रीरामपूर-छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौक येथेच बसवावा या विषयाची विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी या मागणीसाठी मुख्याधिकार्‍यांना घेराव घालण्यात आला होता. त्यावेळी एक चतुर्थांश सदस्यांनी लेखी मागणी केली असता एका विषयासाठी अशी विषेश सर्वसाधारण सभा बोलता येते असे मुख्याधीकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने चोवीस नगरसेवकांच्या सह्याची विषेश सर्वसाधारण सभेच्या मागणीची पत्रे काल मुख्याधीकाऱ्यांकडे सुपूर्त केली व तातडीने विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात यावी अशी मागणी केली.

        महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या, कामकाज चालवणे ८१ मधील १(१),२नुसार एकूण सदस्यांच्या एकचतुर्थांश पेक्षा कमी नाही इतक्या पालिका सदस्यांनी लेखी विनंती सादर केली असता; असे विनंती पत्र प्रशासनाला मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत अशी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते या नियमा वरून छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा श्री शिवाजी चौकतच बसवावा या विषयावरील विषेश सर्व साधारण सभेच्या मागणी ची24 नगरसेवकांची मागणी पत्रे काल मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना सुपूर्त केली. 

     याप्रसंगी समितीचे प्रकाश चित्ते, अरुण पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, डॉक्टर दिलीप शिरसाठ, नगरसेवक किरण लूनिया, प्रवीण पैठणकर, अभिजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 च्या 81 नुसार१) सौ. भारती परदेशी २) श्रीनिवास बिहाणी ३) सौ. चंद्रकला डोळस ४) सौ. भारती कांबळे ५) करण ससाणे ६) प्रकाश ढोकणे ७) शामलिंग शिंदे ८) सौ जयश्री शेळके ९) किरण लुणिया १०) मनोज लबडे ११) सौ. आशा शशांक रासकर १२) संजय फंड १३) सौ. मिरा रोटे १४) दिलीप नागरे १५) राजेश हरिराम अलघ १६) सौ. हेमा रविंद्र गुलाटी १७) सौ. वैशाली चव्हाण १८) दिपक बाळासाहेब चव्हाण १९) रवि पाटील २०) सौ. स्नेहल खोरे २१) जितेंद्र छाजेड २२) अॅड. संतोष कांबळे २३) राजेंद्र पवार २४) सौ शितल गवारे आदींनी सह्या करून नगराध्यक्षांकडे श्री छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा श्री शिवाजी चौकातच बसवावा या विषयासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी अशी मागणी केली आहे. तरी मागणी झाल्यापासून १५ दिवसाच्या आत म्हणजे ६ जुलै पर्यंत नगराध्यक्षांनी अशी विशेष सर्वसाधारण बोलविणे अपेक्षीत आहे अशी मागणी श्री छत्रपती शिवाजी महाराजां अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने केली आहे.