शिवप्रहार न्यूज- आपण उसात जाऊ असे बोलून तरुणीचा विनयभंग...
आपण उसात जाऊ असे बोलून तरुणीचा विनयभंग...
राहुरी - राहुरी तालुक्यातील केंदळ बुद्रुक या गावात राहणारा आरोपी विठ्ठल तारडे याने एका 24 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,ही तरुणी शेतामध्ये असताना आरोपी विठ्ठल तारडे हा तिच्या जवळ आला व आपण उसात जाऊ असे म्हणून तरुणीला धरुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग त्याने केला.
तसेच नवऱ्याला सांगितले तर तुला घरातून हाकलून देईन असे म्हणून धमकी व शिवीगाळ देखील केली. या प्रकरणी आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार आव्हाड हे करीत आहे.