शिवप्रहार न्यूज- मातृ शक्ती दुर्गावहिनी स्वसंरक्षणार्थ भव्य रॅलीला नेवासा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद….

शिवप्रहार न्यूज- मातृ शक्ती दुर्गावहिनी स्वसंरक्षणार्थ भव्य रॅलीला नेवासा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद….

मातृ शक्ती दुर्गावहिनी स्वसंरक्षणार्थ भव्य रॅलीला नेवासा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद….

नेवासा (तालुका वार्ताहर) -

 विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे वतीने दि 2 ऑक्टोबर रोजी नेवाशात दुर्गावाहिनीच्या माध्यमातून भारतीय युवतींना सुसंस्कारित आणि स्वसंरक्षणार्थ सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर व भव्य रॅलीचे आयोजन 

अमृता नळकांडे (पश्चिम महाराष्ट्र प्रांत दुर्गावाहिनी संचालिका) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते 

 दि 2 ऑक्टोबर रोजी प्रशिक्षणार्थी युवतींचे एकत्रिकरण करण्यात आले व सायंकाळी शहरातील हिंदु परिषदे चे जेष्ठ पदाधिकारी यांच्या यांच्या हस्ते शिबिराचे व रॅलीचे उद्घाटन करण्यात आले सदरील रॅलीला मळगंगा देवी पासून सुरवात होऊन शहरातील बस स्थानक , गणपती मंदिर, हेडगेवार परिसर, मोहिनीराज मंदिर, अश्या विविध ठिकाणी तरुणींनी लाठी, तलवार, ढाल, पट्टा, भाला, यांची प्रात्यक्षिके करून दाखवली 

या प्रसंगी समारोप प्रसंगी अमृता नळकांडे यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना आणि उद्दिष्टे याविषयीची माहिती दिली. दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण शिबिरामध्ये शारीरिक, बौद्धिक, चर्चा आणि कृती अशा विविध सत्रांच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थीं युवतींना प्रशिक्षण देण्यात येते तसेच याठिकाणी विविध विषयांवर प्रशिक्षणार्थींना प्रबोधन करण्यात येते पहाटे प्रात:स्मरणात श्लोक, रामनामाचा जप, दिनविशेष, प्रेरक कथा आणि पंचांग सांगितले गेले. शारीरिक सत्रांच्या माध्यमातून सकाळी आणि संध्याकाळी दोन तास दंड, नेमबाजी, नियुद्ध, योग, बाधा ,ढोल, समता इत्यादींचे प्रशिक्षण दिले जातात माहिती नळकांडे यांनी यावेळी दिली 

सदरील रॅली मध्ये सौ.मोहीनीताई डहाळे ,दुर्गावाहिनी प्रखंड संयोजिका नेवासा,सौ अमृता नळकांडे दुर्गा वाहिनी प्रांत संयोजिका पश्चिम महाराष्ट्र, कार्तिकी डहाळे,माहेश्वरी डहाळे, भार्गवी मापारी,सिमाॅन नळकांडे, वैभवि शिंगी, तनिष्का शिंगी, यांच्या सह झाल्या शेकडो रणरागिणी सहभागी झाल्या होत्या रॅली यशस्वी करण्यासाठी श्रीकांत नळकांडे, प्रशांत बहिरट, गणेश मुरदरे, कृष्णा डहाळे, सार्थक परदेशी, विकास लष्करे, दीपक परदेशी, दिगंबर पवार नाना शेंडे, प्रतीक शेजुळ यांनी अथक परिश्रम घेतले. 

 रॅली दरम्यान नेवासा पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता 

-------------------------------------------------------------------------

चोकट-- 

नेवाश्यातील मुलींना आत्मबलशाली करण्याच्या हेतूने लवकरच नेवासा तालुक्यात मुलींचे "शक्ती साधना केंद्र" सुरू करण्यात येणार आहे.जिथे निःशुल्क दरात मुलींना लाठीकाठी, तलवार,नियुद्धाचे प्रशिक्षण दिले जाईल.

अमृता नळकांडे. 

(पश्चिम महाराष्ट्र प्रांत दुर्गावाहिनी संचालिका)