शिवप्रहार न्यूज- फौजदार परीक्षेत श्रीरामपूर पोलीसांचे घवघवीत यश…

फौजदार परीक्षेत श्रीरामपूर पोलीसांचे घवघवीत यश…
श्रीरामपूर- नुकत्याच लागलेल्या खात्यांतर्गत फौजदार (पोलिस उपनिरीक्षक) परीक्षेचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी अपर पोलीस अधीक्षक कार्यालय,श्रीरामपूर येथे नेमणूकीस असलेले पोकॉ /अकाश बहिरट व पोकॉ/ शहाबाज पटेल आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोकॉ/संदीप संसारे या अमंलदाराची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मैदानी चाचणीअसे टप्पे पार करत पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे.
पोलिस विभागावरील ताण कमी व्हावा, यासाठी विभागातील पोलिस शिपाई ते सहाय्यक फौजदार यांच्यासाठी दरवर्षी खात्यांतर्गत फौजदार परीक्षा घेतली जाते. कुटुंबियांनी वेळोवेळी केलेले सहकार्य व वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे यावेळी या पोलीस अमंलदारानी सांगितले.