शिवप्रहार न्यूज- विहीरीत पडुन मुठेवडगाव शेतकरी श्री.मुठे यांचा मृत्यू…
विहीरीत पडुन माळवाडगांव येथील शेतकरी श्री.मुठे यांचा मृत्यू…
मुठेवडगाव - येथील शेतकरी श्री.माणिक मुठे रात्रीच्या वेळी साडे आठ वाजता विज येण्यापूर्वी विहीरीच्या कठड्यावर वीजपंपाकडे जाणारा एच डी पी पाईप फिरवत असताना तोल गेल्याने तुडुंब भरलेल्या विहीरीत पडून मुठेवाडगांव शिवारात माणिक भास्करराव मुठे (वय ५३) या तरूण शेतकऱ्यांचा मृत्यु झाला.
याबाबतची हकिगत अशी कि मुठेवाडगांव शिवारात गट नं. १६ /२ मधील विहीरीवर वीजपंप सुरू करण्यापूर्वी रात्री ८.३० पुर्वी माणिक भास्करराव मुठे व रविंद्र मुठे हे दोघे गेले. लाईट येण्यास पाच दहा मिनिटांचा अवधी असल्याने माणिकने रविंद्र यास,” तू सायपनचे टाळीचे नट खोल तोवर मी पाईप सरळ करून पाईप खालील केबल वर ओढतो” घाईघाईत कठड्यावरील पाईप व केबल ओढताना तोल जाऊन माणिक तुडुंब पाण्याने भरलेल्या विहीरीत पडले. पाण्याचा आवाज ऐकून रविद्रने विहीरीकडे धाव घेतली. दोघांनाही पोहता येत नसल्याने रविद्रने मदतीसाठी आरडाओरडा केला. बाजुचे लोक मदतीला येईपर्यंत माणिक पाण्यात दिसेनासा झाला होता.
घटनेची माहिती मिळताच एकच गर्दी झाली.शोधकार्य घेऊन गळाने वर काढण्यास यश आले . तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले असता ऊपचारापूर्वी डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले.
आज सकाळी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास चालु आहे.