शिवप्रहार न्यूज -रेमडेसीवीर चा काळा बाजार करणार्या आरोपीकडुन PSI ने घेतली पार्टी; अल्पवयीन मुलीसोबत केले अश्लील वर्तन..
रेमडेसीवीर चा काळा बाजार करणार्या आरोपीकडुन PSI ने घेतली पार्टी; अल्पवयीन मुलीसोबत केले अश्लील वर्तन..
पुणे - रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसाकडून त्याचा गैरफायदा घेतल्याचा प्रकार घडला आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाने रेमडेसिविरची जादा दराने विक्री केल्या प्रकरणी पकडलेल्या आरोपींच्या नातेावाईकांकडून पार्टी घेतली. धक्कादायक म्हणजे या पार्टीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तनही केले. दीपक माने असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून वरिष्ठांनी त्याला तातडीने निलंबित केले आहे . PSI दीपक माने हा पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ४ मध्ये कार्यरत होता.
पुणे पोलीस आयुक्तांनी रेमडीसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी १० पथके तयार केली आहे. त्यापैकी गुन्हे शाखेचा युनिट ४ ने बालेवाडी परिसरात दोघा भावांना इंजेक्शनसह पकडले होते. तपासा दरम्यान ,PSI माने याची आरोपीच्या नातेवाईकांशी ओळख झाली. माने हा २० एप्रिल रोजी आरोपींच्या नातेवाइकांच्या घरी पार्टी करण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याने या नातेवाइकांच्या लहान मुलीबरोबर अश्लील वर्तन करून तिची छेडछाड करुन सर्वांना आरोपी करतो अशी धमकी दिली म्हणुन एका महिलेने तक्रार दिल्याने मानेला निलंबित करण्यात आले असुन त्याची चौकशी सुरु आहे.