शिवप्रहार न्यूज- नेवासा बुद्रुक येथील चौकाचे श्री खंडोबा म्हाळसा चौक असे नामकरण;गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते फलकाचे अनावरण…

शिवप्रहार न्यूज- नेवासा बुद्रुक येथील चौकाचे श्री खंडोबा म्हाळसा चौक असे नामकरण;गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते फलकाचे अनावरण…

नेवासा बुद्रुक येथील चौकाचे श्री खंडोबा म्हाळसा चौक असे नामकरण;गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते फलकाचे अनावरण…

नेवासा(प्रतिनिधी)नेवासा बुद्रुक येथील गावात जाणाऱ्या मुख्य कमानी समोरील चौकाचे श्री खंडोबा म्हाळसा चौक असे नामकरण पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हभप गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.

    तीर्थक्षेत्र नेवासा बुद्रुक हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबादेवाची सासुरवाडी असून आदिमाया शक्ती म्हाळसादेवीचे माहेरघर आहे या स्थानावर खंडोबा म्हाळसाचे पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून येणाऱ्या भाविकांना मंदिर मार्ग व स्थान महात्म्य कळावे म्हणून फलक बसवून श्री खंडोबा म्हाळसा चौक असे नामकरण करण्यात आले.

     यावेळी फलकाची फीत ओढून फलकाचे अनावरण हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते तर गावचे जावई प्रा.दिगंबर सोनवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

                यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच अण्णाभाऊ पेचे,सरपंच प्रकाश सोनटक्के,संभाजीराव ठाणगे, उपसरपंच सचिन धोंगडे, माजी उपसरपंच भानुदास रेडे, शिवाजी गपाट,बाळासाहेब मारकळी,अँड.अनिल मारकळी, बाळासाहेब कोकणे,पिंटूभाऊ बोरकर,नाना सुरोशे,भैय्या कावरे,खंडोबा म्हाळसादेवी मंदिराचे पुजारी प्रसाद रहाट, शकील शेख उपस्थित होते.

    या कार्यक्रमाच्या नंतर हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी गावातील पुरातन खंडोबा म्हाळसादेवी मंदिरात जाऊन

खंडोबा म्हाळसादेवी, बानूबाईचे दर्शन घेतले यावेळी मंदिराच्या आतील ग्रॅनाईट कामाचा शुभारंभ हभप देशमुख महाराजांच्या हस्ते करण्यात आला.नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी प्रास्ताविक करत तीर्थक्षेत्र नेवासा बुद्रुक स्थान माहात्म्य बोलतांना विषद केले.

      श्री खंडोबा म्हाळसादेवी मंदिराचे व्यवस्थापक संभाजीराव ठाणगे व सरपंच प्रकाश सोनटक्के यांच्या हस्ते हभप शिवाजी महाराज देशमुख यांचे संतपूजन करण्यात आले.चौक नामकरणामुळे भक्त परिवाराला या स्थानाची ओळख होईल भविष्यात गर्दी ही वाढेल या स्थानाचा महिमा वाढविण्यासाठी कथा कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करण्याचे काम आम्ही करू अशी ग्वाही देत मंदिराच्या कार्यासाठी योगदान देत रहाणार असा निर्धार यावेळी बोलतांना केला.