शिवप्रहार न्यूज-श्रीरामपुरात एका प्रतिष्ठित नगरसेवकाच्या भावाने तब्बल ०२ वर्ष चोरुन वापरली वीज पो.ठाण्यात गुन्हा दाखल...

शिवप्रहार न्यूज-श्रीरामपुरात एका प्रतिष्ठित नगरसेवकाच्या भावाने तब्बल ०२ वर्ष चोरुन वापरली वीज पो.ठाण्यात गुन्हा दाखल...

श्रीरामपुर - श्रीरामपूर नगरपालीकेतील स्वीकृत नगरसेवकाचे बंधू मनोजकुमार छाजेड यांच्याविरोधात महावितरण कंपनीच्या अभियंत्याने वीजचोरीची तक्रार दिल्याने श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या सह हरभजनसिंग नागपाल यांच्यावर वीज अघिनियम चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा रजि.नंबर ८५/२०२१ हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची थोडक्यात हकीकत अशी की,दि.१४/०२/२०१९ ते दि.२४/०२/२०२१ दरम्यान या दोन वर्षांच्या कालावधीत आरोपींनी सिंधी कॅालनी,श्रीरामपूर येथे महावितरण या सरकारी वीज कंपनीची तब्बल ५४,४२० रुपयांची वीज स्वत:च्या फायद्याकरिता चोरुन वापरली म्हणुन महावितरण चे अभियंता योगेश आहेर यांनी फिर्याद दिल्याने वापरकर्ता मनोजकुमार छाजेड व हरभजनसिंग नागपाल यांच्या विरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीसांकडे वर्ग करण्यात आला असुन पो.नि.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.पवार हे तपास करत आहे.