शिवप्रहार न्यूज- गोंधवणीरोड परिसरात शिक्षकाची विष पिऊन आत्महत्या तर पढेगावला घेतला तरुणाने गळफास…

गोंधवणीरोड परिसरात शिक्षकाची विष पिऊन आत्महत्या तर पढेगावला घेतला तरुणाने गळफास…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोड परिसरात राहणारे प्राथमिक शाळा शिक्षक संजय शेळके,वय 55 वर्ष यांनी राहत्या घरी आज सकाळी आत्महत्या केली. मयत शिक्षक शेळके हे हरेगाव येथील प्राथमिक शाळेत नोकरीला होते.त्यांनी आत्महत्या नेमके कोणत्या कारणामुळे केली याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
शेळके यांची पत्नी देखील शिक्षिका असल्याचे समजते.त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तरी श्रीरामपूर शहर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.
तर पढेगाव येथील घटनेमध्ये पढेगाव परिसरात राहणारे प्रशांत तोरणे, वय 23 वर्ष या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. साखर कामगार रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासणीसाठी आणले असता तो मयत असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना कळवले. यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.प्रशांत तोरणे यांनी देखील कोणत्या कारणाने आत्महत्या केली याचा शोध पोलिस घेत आहेत.प्रशांत याचा तरुण वयात मृत्यू झाल्यामुळे त्याच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .