शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरातील सुपर मार्केटमध्ये फेक पेमेंट करून तेलाचे डबे पळवले…
श्रीरामपूर शहरातील सुपर मार्केटमध्ये फेक पेमेंट करून तेलाचे डबे पळवले…
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील बेलापूररोड वरील मुळा-प्रवरा शेजारी असणाऱ्या बी मार्ट या सुपर शॉपी- किराणा दुकानात गिऱ्हाईक बनून आलेल्या दोघांनी पेमेंट झाल्याचे “फेक स्कॅन रिपोर्ट दाखवून” दोन तेलाचे डबे पळवले.
अधिक माहिती अशी की काळा रंगाच्या ऍक्टिवा मोटर सायकल वरून आलेल्या एक पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला आरोपी व दुसरा काळ्या रंगाचा शर्ट घातलेला आरोपी यांनी बी मार्ट दुकानाचे मालक श्री. बोंबले यांच्याकडे चार तेलाचे डबे मागितले. त्यानुसार त्यांना चार तेलाचे डबे देण्यात आल्यानंतर या दोन आरोपींनी बारकोड स्कॅन करून पेमेंट झाल्याचे “फेक स्कॅनिंग रिपोर्ट” दाखवला आणि चार तेलाचे डबे घेऊन हे चोरटे बेलापूर रोडने पळून गेले.
फेक पेमेंट स्कॅनच्या या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून व्यवसायिक बांधवांनी योग्यपणे पेमेंट स्कॅन झाल्याची खात्री करूनच माल द्यावा.