शिवप्रहार न्यूज- मिनी स्टेडियम मधील गाळे श्रीरामपूर पालिकेकडून सील होणार

मिनी स्टेडियम मधील गाळे श्रीरामपूर पालिकेकडून सील होणार…
श्रीरामपूर- श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या कोर्टाशेजारील मिनी स्टेडियम मध्ये 103 गाळे आहेत. यापैकी अनेक गाळे भाडोत्री दिलेले असून या गाळ्यांचे भाडे नगरपालिकेला जमा करण्यात आलेले नाही.
गाळे भाडे थकवणार्यांमध्ये अनेक राजकीय लागेबांधे असलेल्या लोकांचा समावेश आहे.त्यामुळे नगरपालिकेच्या वसुली विभागाच्या वतीने भाडे थकवणारे गाळे सील करण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे.जेणेकरून नगरपालिकेचे होणारे नुकसान टाळले जाईल.