शिवप्रहार न्यूज- ही तर मोगलाईच !! अल्पसंख्यांकांच्या अनुनयाचा आदीक पॅटर्न-चित्ते 

शिवप्रहार न्यूज- ही तर मोगलाईच !! अल्पसंख्यांकांच्या अनुनयाचा आदीक पॅटर्न-चित्ते 

ही तर मोगलाईच !! अल्पसंख्यांकांच्या अनुनयाचा आदीक पॅटर्न-चित्ते 

श्रीरामपूर- छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौकात व्हावा यासाठी झालेल्या आंदोलनात नगराध्यक्ष अनुराधा अदिक यांची बदनामी झाली म्हणून आदीकांनी माझ्यावर ५ कोटीच्या रूपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.त्या दाव्याची नोटीस त्यांनी मला बजावली ती नोटीस मी ॲड. अजित सिंग परदेशी यांच्या कार्यालयात जाहीररित्या स्वीकारली असल्याचे मत भाजपा ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी व्यक्त केले.  
      तसेच अल्पसंख्यांकांच्या अनुनयाची हद्द झाली असुन छत्रपतींचा पुतळा शिवाजी चौकात बसविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,त्यासाठी कुठलेही बलिदान द्यावे लागले तरी चालेल,आम्ही असल्या हल्ल्यांना आम्ही खात नाही,ही तर अस्मितेची लढाई आहे आणि ती तर लढणारच, लढाई पूर्ण जिंकल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असे प्रकाश चित्ते यांनी सांगितले.
       शिवप्रहार प्रतिष्ठान या संघटनेने शिवजयंतीच्या दिवशी छत्रपतींचा आश्वारुढ पुतळा बसवला तो पुतळा प्रशासनाने हलवल्यानंतर पुढे अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या.त्यात चित्ते यांनी अदिक यांच्यावर टिका केली होती त्याबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे .