शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरच्या व्यापारीचे गोंडेगाव येथील दुकान चोरट्यांनी फोडले; पन्नास हजारपेक्षा जास्त मुद्देमालाची चोरी…
श्रीरामपूरच्या व्यापारीचे गोंडेगाव येथील दुकान चोरट्यांनी फोडले; पन्नास हजारपेक्षा जास्त मुद्देमालाची चोरी…
श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील पुणतांबा रोडवर असणाऱ्या गोंडेगावातील भुसार मालाचे व्यापारी महेंद्र मोहनलाल पांडे यांचे दुकान काल रात्री काही चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे.दुकानाचा पत्रा कापुन चोरट्यांनी सोयाबीनच्या गोण्यांमध्ये भरलेला 15 ते 20 क्विंटल वजनाचा मुद्देमाल (जवळपास 50,000₹ किंमतीचा) चोरून नेला.
याप्रकरणी महेंद्र पांडे हे श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणार असल्याचे कळते. पत्रा फोडून चोरीच्या प्रकाराची गोंडेगाव भागात जोरदार चर्चा आहे.पांडे हे श्रीरामपूर शहरात राहतात.