शिवप्रहार न्यूज- २४ तासांत श्रीरामपुरात ०५ कोरोना रूग्ण; नागरिकांनी खबरदारी घ्यावी…
२४ तासांत श्रीरामपुरात ०५ कोरोना रूग्ण; नागरिकांनी खबरदारी घ्यावी…
श्रीरामपूर - जीवघेण्या करोनापासून श्रीरामपूरकरांची सुटका झाली असे वाटत असतानाच आता पुन्हा करोना डोके वर काढत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे.मागील २४ तासांमध्ये जिल्ह्यात नवीन १४ रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक श्रीरामपुरात ५ रुग्ण पॉझीटिव्ह आले आहेत.
तसेच नगर शहर व परिसरात ४, नेवासा २, राहुरीत १ रुग्ण आढळला आहे. तर एक जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहे. या सर्वावर उपचार सुरू आहेत.
दोन वर्षांपासून करोनाने जगात हाहाकार उडविला होता. त्यात अनेकांचे बळी गेले. त्यानंतर लसीकरणाच्या माध्यमातून हळूहळू करोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. पण आता करोना रुग्ण पुन्हा आढळू लागले आहेत.
आता कुठे सर्व व्यवहार सुरूळीत झाले आहेत. त्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ती आणखी वाढू नये यासाठी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी न घाबरता योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.