शिवप्रहार न्यूज -कोरोना लॅाकडाऊन मुळे शेतकऱ्यांना विशेष अर्थिक मदत मिळणेबाबत शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र...!!! 

शिवप्रहार न्यूज -कोरोना लॅाकडाऊन मुळे शेतकऱ्यांना विशेष अर्थिक मदत मिळणेबाबत शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र...!!! 

कोरोना लॅाकडाऊन मुळे शेतकऱ्यांना विशेष अर्थिक मदत मिळणेबाबत शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र...!!! 

संगमनेर-

 देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा विचार करता जवळपास एक तृतीयांश पेक्षा जास्त केसेस या एकट्या महाराष्ट्रात सापडत आहेत. अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये कोरोना लस तयार होत असताना सुद्धा पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्हे रेड झोन मध्ये येत असतील तर ही गोष्ट खऱ्या अर्थानं न पटणारी आहे. औषधांचा कृत्रिम तुटवडा तर निर्माण केला जात नाही ना हा प्रश्न जनसामान्यांना पडलेला आहे.कोरोना रुग्णांची होणारी आर्थिक लूट आणि औषधांचा काळाबाजार यातून जनसामान्यांना मुक्तता मिळेल का? हा प्रश्न सतावत आहे.

रेमेडीसीवर औषधाचा क्रुत्रीम तुटवडा निर्माण करून तेच औषधे जास्तीच्या दरात विकणारांवर कठोर कार्यवाही करा तसेच कोरोना पेशंटकडुन जास्तीचे बील घेणाऱ्या हाँस्पीटलवरही कठोर कार्यवाही करा, म्हणजे अस करणार्या चांडाळ चौकटीला चाप बसेल.

रूग्नांना योग्य बील तसेच औषधेही योग्य किमतीत उपलब्ध होतील.

         तसेच अवकाळी पाऊस गारपीट त्यापाठोपाठ कोरोना आणि लॉक डाऊन या अस्मानी-सुलतानी संकटांनी बळीराजा पुर्णपणे भुईसपाट झालेला आहे.

अवकाळी पाऊस गारपीट कोरोना आणि लॉक डाऊन या सर्व प्रसंगांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष प्रकारची मदत होण्यासाठी आणि कोरोना महामारी चा सामना करण्यासाठी शेतकरी बांधवांना विशेष पॅकेज जाहीर करावे.

         पिक कर्जाविषयी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी दिली त्या बद्दल हार्दिक अभिनंदन, पण जे शेतकरी नियमित कर्जफेड करण्यासाठी सोनं-नानं गहाण टाकणे, पशुधन विकणे त्यातुन पूर्तता झाली नाही तर पर्यायाने खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन बँकांची परतफेड वेळेवर करून आपली पत राखतो, त्यावर नेहमीच अन्याय का?

              महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान रुपये 50000 देण्याचे मान्य केले होते त्या रकमेची सरकारदरबारी तातडीने तरतूद होऊन नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे 50 हजार रुपये देण्यात यावेत.

                सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीमुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आर्थिक संकटात सापडला असून सध्याचे पीक कर्जाचे हप्ते म्हणजेच एप्रिल,मे,जून-2021 ला देय असतील अशा पीक कर्जाच्या हप्त्यांचे फक्त व्याज जमा करून त्या शेतकऱ्यांना नियमित कर्जदार करून घ्यावे .

          घरगुती वीज बिलासंदर्भात खूप साऱ्या तक्रारी ग्राहकांकडून येत असताना महावितरण कडून त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही;घरगुती विज बिल जे ग्राहक नियमित भरतात अशा ग्राहकांना एक महिन्याचे मोघम विज बिल 35000, 50000, 60000 अश्याप्रकारे ग्राहकांना मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे अशा तक्रारींचा तातडीने निपटारा करून ग्राहकांना न्याय द्यावा अशा आशयाचे पत्र शिवश्री.राहुल ढेंबरे ,संस्थापक/प्रदेशाध्यक्ष

शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांनी मुख्यमंत्री यांना दिले आहे.