शिवप्रहार न्यूज- मध्यवस्तीतील वेश्या व्यवसायावर छापा; ३ महिलांची सुटका, १ ताब्यात,
मध्यवस्तीतील वेश्या व्यवसायावर छापा; ३ महिलांची सुटका, १ ताब्यात,
Dysp मिटके, PI दराडे यांच्या पथकाची कारवाई …
राहुरी- तालुक्यातील गुहा येथे मध्यवस्तीतील वेश्या व्यवसायावर छापा टाकून ३ पीडित परप्रांतीय महिलांची सुटका करून एका महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई Dysp संदीप मिटके आणि PI दराडे यांच्या पथकाने केली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, काल दि.09/05/2022 रोजी संदिप मिटके Dysp श्रीरामपूर विभाग यांना राहुरी तालुक्यातील गुहा येथील एक महिला आरोपी पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याबाबत खात्रीशिर माहिती मिळाली.
त्याप्रमाणे Dysp संदिप मिटके यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन गुहा येथे बनावट ग्राहक पाठवुन छापा टाकला. यावेळी ३ पिडीत परप्रांतीय महिलांची सुटका केली असून एक महिला आरोपी विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन गु.र.क्र. 388/2022 अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम कलम 3,4,5,7,8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील विशेष बाब म्हणजे सदर वेश्याव्यवसाय हा गुहा गावातील भर मध्यवस्तीत सुरू होता व त्याची माहिती गावातील नागरिकांना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कारवाईमुळे Dysp संदीप मिटके आणि pi दराडे यांच्या पथकाचे गावातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, यांचे मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके, PI दराडे, Psi बोकील, Asi राजेंद्र आरोळे, HC औटी, HC जायभाये, लक्ष्मण बोडखे, PN विकास साळवे, पो. कॉ. नितीन शिरसाठ, पो. कॉ. आजिनाथ पाखरे, रविंद्र कांबळे, म.पो.कॉ. तृप्ती गुणवंत आदींनी केली.