शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरात आजोबाकडून नातवावर कुऱ्हाडीने वार …

श्रीरामपूर शहरात आजोबाकडून नातवावर कुऱ्हाडीने वार …
श्रीरामपूर - शहरातील सम्राटनगर, सूतगिरणी परिसरात राहणारा तरूण हर्षद कैलास धनवटे,वय २३ याला व त्याच्या भावास त्यांचा चुलत आजोबा रामनाथ केशव धनवटे,रा. सम्राटनगर, सूतगिरणी परिसर,श्रीरामपूर याने विजबिलाच्या पैशांच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.तसेच लाकडी दांडयाने व कुऱ्हाडीने वार करुन जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
जखमी हर्षद कैलास धनवटे याच्या फिर्यादीवरून आरोपी चुलत आजोबा रामनाथ केशव धनवटे याच्याविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात भादंवि कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोना.राशिनकर हे पुढील तपास करत आहे.