शिवप्रहार न्यूज -विविध मागण्यांसाठी बेलापूर ग्रामपंचायतीला तरुणांनी दिले निवेदन...
विविध मागण्यांसाठी बेलापूर ग्रामपंचायतीला तरुणांनी दिले निवेदन...
बेलापूर बुद्रुक -ग्रामपंचायत सरपंच ग्राम विकास अधिकारी यांना कारणे विनंती लेखी निवेदन देतो की,बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत फंडातील सन 2020-21 व सन 2021 -22 या दोन वर्षांचा मागासवर्गीय 15 टक्के, अपंग 5 टक्के, महिला व बालकल्याण 10 टक्के ग्रा. प. फंडातून खर्च करावयाचा निधी चा वाटप करावा. तसेच Corona सारख्या आजारामुळे लॉक डाऊन असल्याने मोठया प्रमाणात मोल मजुरीचे काम बंद असून या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या मागासवर्गीय अपंग महिला यांना जीवनावश्यक वस्तू ,औषधे आदी कामा साठी रोख स्वरूपात ग्रा. पंचायतीने या निधी तील रकमेतून आर्थिक सहाय्य करावे. गावामधे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे डेंगू ,मलेरिया,टायफॉईड सारखे साथी च्या आजार चा फैलाव होऊ शकतो यासाठी गावा मध्ये व वाड्या वस्त्या वर डास निर्मूलन औषधा ची फवारणी करण्यात यावी. अश्या विविध मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सरपंच श्री.महिंद्र साळवी ,ग्राम विकास अधिकारी श्री.तगरे भाऊसाहेब यांना ऐनतपूर सोसायटी चेअरमन श्री.चंद्रकांत पाटील नाईक, विद्यार्थी कॉंग्रेस राज्य सचिव अक्षय नाईक,विद्यार्थी कॉंन्ग्रेस तालुकाअध्यक्ष वैभव कुर्हे,आयाज भाई सय्यद, विजय शेलार, भाऊसाहेब तेलोरे, सुरेश अमोलिक, अनिल पवार, प्रकाश जाजू, अजय अनाप, सौरभ कापसे, विजय कुर्हे,तुषार कुर्हे, सागर धनसिंग यांच्या वतीने देण्यात आले.
त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य भरत शेठ साळुंके व रविंद्र शेठ खटोड, मुश्ताक शेख, रमेश अमोलिक आदी उपस्थित होते.