शिवप्रहार न्यूज -लॅाकडाऊन उठल्यानंतर श्रीरामपुरातील कोरोना रुग्ण संख्येचा आकडा दोन महिन्यातील निच्चांकावर
लॅाकडाऊन उठल्यानंतर श्रीरामपुरातील कोरोना रुग्ण संख्येचा आकडा दोन महिन्यातील निच्चांकावर ...
श्रीरामपूर- नगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने घसरत असतानाच श्रीरामपूर तालुका व शहरातील रुग्णसंख्या देखील अतिशय झपाट्याने कमी होत असताना दिसत आहे.
आज दिनांक 08/06/2021 रोजी मंगळवारी श्रीरामपूर शहर व तालुक्याची कोरोना रुग्णसंख्या अवघी 26 इतकी निघाली आहे.काल सोमवार दिनांक 7/6/20121 रोजी नगर जिल्ह्यातील लॅाकडाऊन उठविल्यानंतर देखील पहिल्या दिवशी रुग्णसंख्येत कुठलीही वाढ आढळून आली नाही.
एकूणच रुग्ण संख्याही झपाट्याने घटत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या व श्रीरामपूर शहर -तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने ही अतिशय सकारात्मक अशी बाब आहे.