शिवप्रहार न्यूज - छावाच्या पदाधिकाऱ्याला अज्ञातांकडून मारहाण; वाघ फ्रॅक्चर
छावाच्या पदाधिकाऱ्याला अज्ञातांकडून मारहाण; वाघ फ्रॅक्चर
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- छावा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ वाघ यांना डोळ्यात मिरची टाकून दांडा, रॉडने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विश्वनाथ पांडुरंग वाघ वय-40 रा-चितळी स्टेशन, ता.राहता हे दिनांक 5 जानेवारी रोजी रात्री ९ ते ९ः३० च्या दरम्यान चितळी येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे पटांगणात चकरा मारत असताना तेथे तीन अनोळखी इसम येऊन त्यातील एकाने डोळ्यात मिरचीची पूड टाकून दोघा जणांनी वाघ यांच्या पायावर, हातावर लाकडी दांडा व लोखंडी रॉडने जबर मार हाण केली. यात वाघ यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
याप्रकरणी वाघ यांनी श्रीरामपूर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरून तीन अज्ञात आरोपींविरुद्ध भादवी कलम 326, 34, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनि.ज्ञानेश्वर थोरात हे करीत आहेत.