शिवप्रहार न्यूज - श्री विठ्ठल मंदिरातील भजन, कीर्तनात मज्जाव करणाऱ्या प्रांताधिकारी गुरव याला बडतर्फ करण्याबाबत राष्ट्रीय वारकरी परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…

शिवप्रहार न्यूज - श्री विठ्ठल मंदिरातील भजन, कीर्तनात मज्जाव करणाऱ्या प्रांताधिकारी गुरव याला बडतर्फ करण्याबाबत राष्ट्रीय वारकरी परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…

श्री विठ्ठल मंदिरातील भजन, कीर्तनात मज्जाव करणाऱ्या प्रांताधिकारी गुरव याला बडतर्फ करण्याबाबत राष्ट्रीय वारकरी परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…

मुंबई -प्रांताधिकारी गुरव याला बडतर्फ करण्याबाबत राष्ट्रीय वारकरी परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले ते खालीलप्रमाणे 

विषय:- श्री विठ्ठल मंदिरातील भजन, कीर्तनात मज्जाव करणाऱ्या प्रांताधिकारी श्री. गजानन गुरव यांना बडतर्फ करण्याबाबत..... 

महोदय

सप्रेम जय हरी! महाराष्ट्रातील पंढरपूर क्षेत्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल मंदिरात हरिनामाचा गजर व कीर्तनाची परंपरा संतांनी निर्माण केली. संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांच्या कीर्तनाला श्री विठ्ठल स्वतः उपस्थित रहात सर्वच संतांनी श्री विठुरायाचे महात्म गाऊन नामस्मरण, भजन,कीर्तनाची परंपरा मंदिरा मंदिरामधून घेण्यात सांगितले व ही परंपरा आज पर्यंत व पुढे अंतापर्यंत सुरूच राहील. मंदिर सरकारीकरण झाल्याचाच हा दुष्परिणाम आहे. याकरता मंदिर भक्तांच्याच ताब्यात द्यावीत परंतु आपल्या अधिकाराचा वापर धर्मा करता करण्यापेक्षा अधर्मा करता करण्याचे दु:साहस सुशिक्षित समजणारे काही अधिकारी करतात. कीर्तन बंद करण्याचे हे प्रकार काही ठिकाणी पोलीस ही करीत असतात व त्याकरीता नाहक वारकऱ्यांना त्यांच्याशी संघर्ष करावा लागतो. यास्तव हिंदुत्ववादी सरकारने आता लक्ष देऊन वारकऱ्यांच्या, समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी व पाकिस्तानला ज्याप्रमाणे ईशानिंदेला फाशीचीच शिक्षा आहे. 

       तशाच प्रकारचा कायदा संत व छ. शिवराय यांच्या महाराष्ट्रात सक्षम कायदा करावा, अशी आम्ही मागणी करीत आहोत व पंढरपूरचे प्रांताधिकारी श्री गजानन गुरव यांना तात्काळ निलंबित करावे. ही नम्र विनंती आहे. 

                 आपला विश्वासू

      श्री ह भ प वेणुनाथ महाराज विखे प्रचारक राष्ट्रीय वारकरी परिषद

      श्री ह भ प विठ्ठल महाराज अभंग विभाग प्रमुख राष्ट्रीय वारकरी परिषद