शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त...
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त...
श्रीरामपूर-
(प्रतिनिधी) आज दि. 10/09/2021 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव आऊटसाईड येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी हरेगाव आऊट साईड परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश करण्यात आला
आरोपी. क्र.)1) अशोक बाबुराव गायकवाड
42,000/- रु. कि.चे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)
3500/- रू किमतीची 35 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)
आरोपी. क्र.) 2. सुधीर काशिनाथ गायकवाड
38,500/- रु. कि.चे 550 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)
2000/- रू किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं. अं.)
आरोपी. क्र.) 3. अशोक रामभाऊ गायकवाड
35,000/- रु. कि.चे 500 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)
3500/- रू किमतीची 35 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू ( आंबट उग्र वासाची किं. अं.)
आरोपी. क्र.) 4. संतोष चंद्रभान गायकवाड
14,00/- रु. कि.चे 200 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)
1,500/- रू किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं. अं.)
एकूण 1,40,000/-/- रुपये
वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अचानक झालेल्या व लागोपाठ सुरू असलेल्या कारवाईमुळे हरेगाव आऊटसाईड परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे हरेगाव येथील महिलांनी Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक करून आभार व्यक्त केले.
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p संदीप मिटके, ASI.राजेंद्र आरोळे,H.c. सुरेश औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ, लक्ष्मण राऊत, अमोल गायकवाड, प्रवीण भोजे, आर सी पी पथक आदींनी केली.