शिवप्रहार न्यूज- मला सगळे पोलीस ओळखतात, पोलीस स्टेशन मी चालवतो असे बोलुन छ.शिवाजी चौकात शासकीय कामात अटकाव करणाऱ्या बंटी आछडा याच्या विरोधात गुन्हा दाखल..
मला सगळे पोलीस ओळखतात, पोलीस स्टेशन मी चालवतो असे बोलुन छ.शिवाजी चौकात शासकीय कामात अटकाव करणाऱ्या बंटी आछडा याच्या विरोधात गुन्हा दाखल...
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी श्री.संदीप संसारे ,वय-३० वर्षे हे त्यांच्या सोबतच्या कर्मचारींसह काल दि.१०/०५/२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे वरिष्ठांनी ठरवुन दिलेले कर्तव्य बजावत होते. सकाळी ०९:०० वा च्या सुमारास तेथुन गुजरात पासींग ची फोर व्हीलर ५१५१ ही भरधाव वेगाने जात होती.म्हणुन ड्युटीवरील पोलीस शिपाई श्री. संसारे यांनी गाडीला थांबण्याचा इशारा केला असता ती गाडी थेट संसारे यांच्या अगदी जवळ येवुन थांबली. त्यामुळे संसारे यांनी गाडीचालक बंटी आछडा याला तुम्हाला थांबण्याचा इशारा केला तरी गाडी का थांबवली नाही अशी विचारणा केली. त्यावर बंटी आछडा हा पोलीस संसारे यांना म्हणाला की,मी बंटी आछडा आहे,मला तुमच्या पोलीस स्टेशनचे सर्व जण ओळखतात,मी तुमचे पोलीस स्टेशन चालवतो, तु लायकीत राहा शाईनिंग मारु नको ,तुमची पोलीसांची लायकी .......प्रमाणे (अतिशय असभ्य शब्द) आहे असे बोलुन निघुन गेला म्हणुन पोलीस शिपाई श्री.संसारे याच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा रजि.नंबर ६२९/२०२१ कलम १८६,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा आज ११/०५/२०२१ रोजी दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा दाखल करु नये यासाठी काल दिवसभर माझ्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील एक अधिकारी व त्यांचे दोन खास कर्मचारी यांनी खुप दबाव आणल्याचे पो.शि.श्री.संदीप संसारे यांनी सांगितले. बंटी आछडा हा दोन नंबर धंद्या करत असल्याने काही पोलीस त्याच्या अपकृत्यांकडे जाणुन बुजूण दुर्लक्ष करतात त्याला पाठीशी घालतात व आपल्याच पोलीस बंधुंवर दमदाटी करतात म्हणुन माझ्यावर आज ही वेळ आल्याचे श्री.संसारे यांचे म्हणणे आहे.
राज्यभर पोलीस हे जनतेची सुरक्षा करण्याबरोबरच सध्याच्या लॅाकडाऊन काळात मे महिन्याच्या उन्हातान्हात आपले कर्तव्य बजावत आहे. श्रीरामपूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असे कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचारींवर एक दोन नंबर वाला अशी दमदाटी करुन जात असेल तर ही अतिशय खेदाची बाब आहे. तरी वरिष्ठ पोलीस अधिकारींनी यात लक्ष घालुन पोलिसांवर गरळ ओकणार्या प्रवृत्तीविरुद्ध अतिशय कठोर कारवाई करावी अशी मागणी जनमानसातुन उठत आहे.