शिवप्रहार न्यूज - अवैध वाळू वाहतुकीविरुध्द कारवाई करुन १५ लाख ६० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त;नगर LCB ची कारवाई...
अवैध वाळू वाहतुकीविरुध्द कारवाई करुन १५ लाख ६० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त;नगर LCB ची कारवाई...
नगर - प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, नगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके यांना जिल्ह्यातील अवैध वाळु उत्खनन/उपसा व वाहतुकी विरुध्द विशेष मोहिमेचे आयोजन करुन कारवाई करणे बाबतचे आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/मनोहर शेजवळ, भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/विजय वेठेकर, संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, पोकॉ/रणजीत जाधव व कमलेश पाथरुट असे शेवगांव तालुक्यात अवैध वाळु उत्खनन व वाहतुकी विरुध्द कारवाई करणे करीता पेट्रोलिंग करत असतांना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक इसम बोधेगांव ते गेवराई रोडने एक पिवळा राखाडी रंगाचा विना नंबर हायवा मधुन अवैधरित्या वाळु भरुन चोरी करुन वाहतुक करत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
पोनि/अनिल कटके यांनी नमुद माहिती लागलीच पथकास कळवुन पंचांना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबतचे सुचना दिल्या. नमुद सुचना प्रमाणे पथकातील पोलीस अंमलदार यांनी पंचांसह बोधेगांव ते गेवराई रोडने, सुकळी फाटा येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असतांना एक विना नंबर पिवळा राखाडी रंगाचा हायवा येतांना दिसला पथकाची खात्री होताच त्यास हात दाखवुन थांबण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन थांबविले त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन वाहनाची पाहणी करता त्यामध्ये वाळु असल्याची खात्री झाल्याने सदर चालकास वाळु वाहतुकीचे परवान्या बाबत विचारपुस केली असता त्याने त्याचेकडे शासनाचा वाळु वाहतुकीचा कोणताही परवाना नसले बाबत सांगितले. त्यामुळे पथकाने त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) शब्बीर बादशाह शेख वय 32, रा. लाडजळगांव, ता. शेवगांव असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीने अवैधरित्या शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकिय मालकिची वाळु अवैधरित्या चोरी केल्याने 15,60,000/- (पंधरा लाख साठ हजार) रुपये किंमतीचा एक हायवा व सहा ब्रास वाळुसह ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 08/2023 भादविक 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.