शिवप्रहार न्यूज-दारू पिण्यावरून पटारेचा खून; आरोपी कोकणेला अटक…
दारू पिण्यावरून पटारेचा खून; आरोपी कोकणेला अटक…
श्रीरामपूर - दारूवरून एका तरूणाचा खून करण्याचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर परिसरात घडला आहे.
अधिक माहिती अशी की, अशोक भाऊसाहेब पटारे, वय-३५ या तरूणाच्या डोक्यात टणक वस्तूने मारून खून करून पाण्यात ढकलून दिले. हा प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर गावच्या शिवारात प्रवरा नदी पात्रात काळेखडी परिसरात घडला. याप्रकरणी डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलिसांनी तातडीने कारवाई करत, राजेंद्र साहेबराव कोकणे याला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक भाऊसाहेब पटारे, रा.पाथरे खुर्द, ता. राहुरी याला दारू पिण्याच्या कारणावरून आरोपी राजेंद्र साहेबराव कोकणे, रा.पाथरे खुर्द, ता. राहुरी याने लोखंडी टणक वस्तूने डोक्यात मारले व अशोक पटारे याला नदीच्या पाण्यात ढकलून दिले व खून केला. हा प्रकार दि. १४ मे ते १५ मेच्या दरम्यान घडला.
मयत अशोक पटारे याची पत्नी प्रियांका अशोक पटारे, धंदा-शेती, रा.हाडकी पाथरे शिवार, ता. राहुरी हिने श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी राजेंद्र साहेबराव कोकणे याच्याविरूद्ध भादंवि कलम ३०२, २०१, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ चे कलम ३(२) (व्हीए) प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मयत हा मागास समाजाचा आहे हे माहित असतांनाही आरोपी कोकणेने त्याचा खून केला.
घटनास्थळी डिवायएसपी संदीप मिटके, पोनि खाडे यांनी भेट दिली. डिवायएसपी मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी आरोपी राजेंद्र कोकणेला पकडले असून पुढील तपास डिवायएसपी संदीप मिटके हे करीत आहेत.