शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात जुगार अड्ड्यावर छापा;पावणेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात जुगार अड्ड्यावर छापा;पावणेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...

श्रीरामपुरात जुगार अड्ड्यावर छापा;पावणेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...

 श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील बाबरपुरा, पाण्याच्या टाकी जवळ, वार्ड नंबर 2 येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांनी छापा टाकून आरोपी इमतियाज अजिज शहा उर्फ बबलू ,वय 32 वर्षे याच्यासह इतर 22 जणांवर कारवाई केली.

       या आरोपींमध्ये काही आरोपी अल्पवयीन असल्याचे कळत आहे.काल श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे फिर्यादी पोलीस शिपाई किशोर जाधव यांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली आहे.

        या कारवाईत पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप यांच्यासह पोलीस नाईक अमोल जाधव, पोलीस नाईक बैसाणे, पोलीस शिपाई नरवडे ,पोलीस शिपाई गायकवाड आदींनी सहभाग घेतला.

       अल्पवयीन मुलांचा जुगार खेळण्यात सहभाग असल्याने पालकांसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे.