शिवप्रहार न्यूज - श्रीरामपुरात बिबट्याच्या पिंजऱ्यातील बोकड पळवला
श्रीरामपुरात बिबट्याच्या पिंजऱ्यातील बोकड पळवला...
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सात भागात असणाऱ्या सुर्यनगर परिसरातील नागरिकांना गेल्या आठवडाभरापासून बिबट्याचे दर्शन होत आहे.या बिबट्याने एका हरीण मादीची देखील त्याठिकाणी शिकार केल्याची घटना घडली होती.
म्हणून सूर्यनगर परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार वन विभागाने 19 जून रोजी सूर्य नगर भागात बिबट्याचा पिंजरा बोकडासह लावला होता.बिबट्या पिंजऱ्यात अडकण्यासाठी हा बोकड पिंजऱ्यात लावला जातो.
परंतु काल कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बिबट्याच्या पिंजऱ्यातील बोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. हा बोकड कोणी चोरून नेला त्याचा शोध चालू आहे. जनावरे चोरणाऱ्या चोरट्यांनी किंवा बोकड पार्टी करण्यासाठी काही टारगट पोरांनी बोकड चोरी केली असावा अशी चर्चा या भागात सुरु आहे.