शिवप्रहार न्यूज- कोल्हारमध्ये ०३ गावठी कट्टे पकडले;०२ आरोपी श्रीरामपूरचे…

शिवप्रहार न्यूज- कोल्हारमध्ये ०३ गावठी कट्टे पकडले;०२ आरोपी श्रीरामपूरचे…

कोल्हारमध्ये ०३ गावठी कट्टे पकडले;०२ आरोपी श्रीरामपूरचे…

कोल्हार- कोल्हारमध्ये काल पुन्हा तीन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे एलसीबीच्या पथकाने पकडले आहे. यातील दोन आरोपी हे श्रीरामपूरचे आहे. दोन आरोपी कोल्हारचे आहे तर १ आरोपी हा संगमनेरचा आहे. विशेष म्हणजे मागच्या शुक्रवारी कोल्हारमध्ये तीन गावठी कट्टे पकडण्यात आले होते. आठवडाभरात ही दुसरी घटना घडल्याने कोल्हार परिसर व कोल्हार हे गावठी कट्टा विक्रीचे केंद्र तर बनत चालले नाही ना ? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

      याबाबतची अधिक माहिती अशी की,काल ८ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके यांना गुप्त माहिती मिळाली की, तीन ते चार इसम कोल्हार बु।। येथे गौतमनगर राजवाडा परिसरात चिंचेच्या झाडाखाली बसले असून त्यांनी गावठी बनावटीचे कट्टे व काडतुसे विक्रीकरिता आणले आहे. या माहितीनुसार स. पो. भाऊसाहेब काळे यांनी तातडीने दोन पंच सोबत घेऊन ते खासगी वाहनाने नगर हून राहुरी मार्गे कोल्हार बु।। गावात महादेव मंदिराजवळ आले असता त्यांना ३.३० च्या सुमारास चिंचेच्या झाडाखाली तीन-चार इसम दिसले. त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी झडप घालून त्या सर्वांना पकडले तेंव्हा त्यांच्याकडे तीन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. 

     पोलिसांनी ९१ हजार ५०० रुपये किंमतीचे हे तीन देशी बनावटीचे पिस्टल व तिन जिवंत काडतुसे जप्त करुन आरोपी दुर्गेश बापू शिंदे वय ३५ रा. सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं. ७ श्रीरामपूर, हरुण उर्फ राजू रशिद शेख वय ३१, रा. आहिल्यादेवीनगर, वॉर्ड नं. २, श्रीरामपूर, अश्पाक उर्फ मुन्ना रफिक पटेल वय २१, रा. बेलापूर रोड, शाहनगर, कोल्हार बु।। ता. राहाता. प्रसन्न विलास लोखंडे वय ३२, रा. गौतमनगर, राजवाडा, कोल्हार बु।।, ता. राहाता आणि सदानंद राजेंद्र मन्तोडे वय २७, रा. शिबलापूर ता. संगमनेर यांच्या विरोधात शस्त्र अधिनियम १९५९ कलम २५/ ३/७ नुसार लोणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून तपास लोणी पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई मा.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती.स्वाती भोर, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री.संजय सातव, उविपोअ शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल कटके सुचनेवरुन सफौ.मनोहर शेजवळ, भाऊसाहेब काळे, पोहेकॉ.विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना.शंकर चौधरी, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, दिलीप शिंदे, राहुल सोळुंके, पोकॉ.रणजीत जाधव, चापोहेकॉ.संभाजी कोतकर व भरत बुधवंत यांनी केली आहे.