शिवप्रहार न्यूज - बनावट रेमडेसीवीर चा काळा बाजार करणारा मातापुरचा रईस अफजल शेख श्रीरामपुर पोलीसांच्या जाळ्यात फसला..

शिवप्रहार न्यूज - बनावट रेमडेसीवीर चा काळा बाजार करणारा मातापुरचा रईस अफजल शेख श्रीरामपुर पोलीसांच्या जाळ्यात फसला..

बनावट रेमडेसीवीर चा काळा बाजार करणारा मातापुरचा रईस अफजल शेख श्रीरामपुर पोलीसांच्या जाळ्यात फसला..

श्रीरामपूर- कोरोना संकट दिवसेंदिवस भयानक रुप धारण करत असुन अनेक रुण्गांना रेमडेसीवीर इंजेक्शन ची गरज भासत आहे. रेमडेसीवीर सरकारने मुबलक प्रमाणात न दिल्याने रुण्गांचे नातेवाईक रेमडेसीवीरचे इंजेक्शन मिळवण्यासाठी वणवण भटकत आहे.श्रीरामपुरातील एका रुण्गाला अर्जंट रेमडेसीवीर ची आवश्यकता असल्याने रुण्गाचे नातेवाईक रेमडेसीवीर मिळवण्यासाठी मोठी मेहनत घेत होते. त्या दरम्यान रुण्गाच्या नातेवाईकाला रईस अफजल शेख, वय-२०,राहणार-मातापुर ता.श्रीरामनगर याने संपर्क करुन रेमडेसीवीर देतो असे सांगितले.परंतु पेशंटच्या नातेवाईकाला संशय आल्याने त्याने घटलेली हकीकत पोलिसांना सांगितली.त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दि.१८/०४/२०२१ रोजी सायंकाळ ०५:०० वा रईस शेख याला ओव्हर ब्रीज जवळ,श्रीरामपूर येथे ताब्यात घेतले.त्याच्याकडुन बनावट

रेमडेसीवीर इंजेक्शन पोलिसांनी हस्तगत केले.

        पोलिसांनी रईस शेखकडे अधिक विचारपुस केली तेव्हा शेखने सांगितले की,डाॅक्टरांनी वापरुन कचराडब्यात फेकून दिलेल्या रिकाम्या रेमडीसीवीर इंजेक्शन मध्ये तो सलाईन मधील पाणी भरुन विकायचा. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       रईस शेख ने असे किती बनावट इंजेक्शन अडचणीत असलेल्या कोरोना पेशंट च्या नातेवाईकांना विकले ? यामुळे कोणी कोरोना पेशंट दगावले का? याचा तपास श्रीरामपुर पोलीस करत आहे. 

       सुदैवाने श्रीरामपुरातला या पेशंट च्या नातेवाईकाला पोलिसांमुळे ही बाब कळाली आणि या रईस शेख सारख्या विकृत प्रवृत्ती पोलीसांच्या जाळ्यात अडकली.

     ही कामगिरी श्रीरामपुर शहर पो.ठाणे चे पोलीस उपनिरीक्षक श्री.सुरवडे व त्यांच्या पथकातील पो.ना.दुधाडे ,पोशि.किरण पवार पो.ना.वांढेकर,पो.शि.अर्जुन पोकळे यांनी केली.