शिवप्रहार न्युज - टिळक वाचनालयाच्या ग्रंथपाल स्वाती पुरेंची चौकशी होणार…

शिवप्रहार न्युज -  टिळक वाचनालयाच्या ग्रंथपाल स्वाती पुरेंची चौकशी होणार…

टिळक वाचनालयाच्या ग्रंथपाल स्वाती पुरेंची चौकशी होणार…

श्रीरामपूर- शहरातील मेनरोडवरील लोकमान्य टिळक वाचनालयात ग्रंथपाल पदावर काम करणाऱ्या स्वाती पुरे यांचा अतिशय मनमानी कारभार सुरू असून त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी तक्रार श्रीरामपूर भाजपाचे मारुती बिंगले, हंसराज बत्रा, पुष्पलता हरदास,रुपेश हरकल, पूजा चव्हाण,विजय आखाडे यांनी केली होती. 

        प्रांताधिकारी सावंत यांनी त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेतल्याने मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी त्रिदस्यीय समिती नेमून स्वाती पुरेंच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.