शिवप्रहार न्यूज- रक्ताची उलटी होवुन श्रीरामपूर शहरात २६ वर्षाच्या प्रांजलीचा मृत्यू…

शिवप्रहार न्यूज- रक्ताची उलटी होवुन श्रीरामपूर शहरात २६ वर्षाच्या प्रांजलीचा मृत्यू…

रक्ताची उलटी होवुन श्रीरामपूर शहरात २६ वर्षाच्या प्रांजलीचा मृत्यू…

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर शहरात वार्ड नं.- १ सिद्धार्थनगर भागात राहणारी तरूणी प्रांजली विष्णू बोधक, वय २६ वर्षे हिला रक्ताची वांती- उलटी झाल्याने तिला उपचारासाठी श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासले असता प्रांजली विष्णू बोधक या तरूणीचा उपचारापूर्वीच मृत्यू झालेला होता. 

        तशी खबर तेथील डॉक्टरांनी श्रीरामपूर शहर पोलिसात दिली. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून प्रांजली विष्णू बोधक या तरूणीला नेमकी कशाने रक्ताची उलटी झाली ? तिचा मृत्यू कसा झाला? याचा पुढील तपास पोनि. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ. पटेल हे करीत आहेत.