शिवप्रहार न्यूज- कर्जत “सनी पवार” हल्ला प्रकरणातील आणखी ०८ आरोपी अटक...

शिवप्रहार न्यूज- कर्जत “सनी पवार” हल्ला प्रकरणातील आणखी ०८ आरोपी अटक...

कर्जत “सनी पवार” हल्ला प्रकरणातील आणखी ०८ आरोपी अटक...

कर्जत - येथील पो.ठाण्यातील दाखल गु.र.नं I ५४९/२०२२ भा.द.वि-३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०५ (२) सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ चे सुधारणा अधिनिमय सन २०१५ चे कलम- ३(१)(r),३(१)(s), ३(२) (va), ३(२) (५) सह आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी नामे १) शाहरुख आरिफ पठाण, वय २८ वर्षे, रा. लोहारगल्ली कर्जत, ता. कर्जत, जि. अहमदनगर, २) इलाई महबुब शेख, वय २० वर्षे, रा. लोहारगल्ली कर्जत, ता. कर्जत, जि. अहमदनगर, ३) आकिब कुदरत सय्यद, वय २४ वर्षे, रा. हनुमानगल्ली कर्जत, ता. कर्जत, जि. अहमदनगर, ४) टिपु सरिम पठाण, वय १८ वर्षे, रा. लोहारगल्ली, ता. कर्जत, जि. अहमदनगर, ५) साहिल शौकत पठाण, वय २३ वर्षे, रा. लोहारगल्ली कर्जत, ता. कर्जत, जि. अहमदनगर, ६) हर्षद शरीफ पठाण, वय २० वर्षे, रा. लोहारगल्ली कर्जत, ता. कर्जत, जि. , अहमदनगर, ७) निहाल इब्राहिम पठाण, वय २० वर्षे, रा. हनुमानगल्ली कर्जत, ता. कर्जत, जि. अहमदनगर व ८) एक विधीसंघर्षीत बालक यांना आज रोजी कर्जत पोलीसांनी अटक केली असून एकुण अटक आरोपींची संख्या १४ झाली आहे.

          यातील आरोपी ९) सोहेल शौकत पठाण, वय २८ वर्षे, रा. लोहारगल्ली कर्जत, ता. कर्जत, जि. अहमदनगर १०) अब्रार ऊर्फ अरबाज कासम पठाण वय २५ वर्ष रा. लोहारगल्ली, कर्जत ता. कर्जत, ११) जुनैद जावेद पठाण वय-१९ वर्ष रा.पोस्ट ऑफिसचे पाठीमागे, कर्जत १२) हुसेन कासम शेख वय- ४० वर्ष रा. पिंपळे गुरव, कासिद बिल्डींग, पुणे १३) अरबाज अजीज शेख वय २४ वर्ष रा. पारगाव सा.मा.ता.दौण्ड जि.पुणे, व एक विधीसंघर्षीत बालक यांना अटक यापुर्वीच अटक करण्यात आली आहे. आरोपी क्र. ९ ते १३ यांना दि. १०/८/२०२२ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड सुनावण्यात आली आहे.

        सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक साो. अहमदनगर, मा.अपर पोलीस अधीक्षक सो.अहमदनगर, अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर यादव, स.पो.नि./ सतिष गावीत, पो.स. ई. अमरजित मोरे, पो.स. ई. भगवान शिरसाठ, पो.स. ई. अनंत सालगुडे, पो.ना./ संतोष धांडे, पो.ना. शाम जाधव, ईश्वर माने, सचिन वारे, देवा पळसे, अमित बरडे, मनोज लातुरकर यांनी केली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत हे करीत आहेत.