शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरातील शिरसाठ हॉस्पिटल मध्ये चोरी...

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरातील शिरसाठ हॉस्पिटल मध्ये चोरी...

श्रीरामपूर शहरातील शिरसाठ हॉस्पिटल मध्ये चोरी...

श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर एक परिसरात असणाऱ्या शिरसाठ हॉस्पिटल मधील बंदिस्त जनरल वॉर्ड क्रमांक 112 मध्ये मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली आहे.

       अधिक माहिती अशी की,तक्रारदार रोहित दिलीप ढवळे, वय 26,राहणार - खंडाळा,तालुका श्रीरामपूर हे या हॉस्पिटलमध्ये नमूद ठिकाणी असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचा विवो कंपनीचा मोबाईल चोरून नेला आहे.

        याबाबत रोहित यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस नाईक पवार हे पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.