शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरचे मुकुंद कणसे यांना पोलीस उपनिरिक्षक पदी बढती…
श्रीरामपूरचे मुकुंद कणसे यांना पोलीस उपनिरिक्षक पदी बढती…
श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज) - श्रीरामपूर तालुक्याचे भुमिपुत्र मातुलठाण येथील शेतकरी सिताराम कणसे यांचे सुपुत्र सहाय्यक फौजदार मुकुंद कणसे पा. यांना पोलीस दल गृह विभागाकडून पोलीस उपनिरिक्षक पदी बढती देण्यात आली आहे. मुकुंद कणसे यांनी अतिषय जबाबदारीने पोलीस खात्यात नोकरी केली आहे.
श्रीरामपूरचे तत्कालीन अप्पर पोलीस अधिक्षक श्री.सुनिल कडासने यांनी दुध भेसळ प्रकरण बाहेर काढले होते. त्या पथकात मुकुंद कणसे प्रमुख म्हणुन होते . कर्तव्यदक्ष असलेले पीएसआय मुकुंद कणसे यांची लोणी येथे नेमणूक असून त्यांना पीएसआय पदी बढती मिळाल्याने मुकुंद कणसे यांचे एसपी राकेश ओला,अप्पर पोलीस अधिक्षक कलुबर्मे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.