शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरात एका घरावर पडला हातोडा…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरात एका घरावर पडला हातोडा…

श्रीरामपूर शहरात एका घरावर पडला हातोडा…

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर शहरातील रामराव आदिक पुतळा परिसरात तुपे हॉस्पीटलसमोर असलेल्या एका बेकायदा घरावर आज सकाळी कोर्टाच्या आदेशाने पालिकेने हातोडा टाकत हे बांधकाम पाडले.      

      याठिकाणी असणारे हे बांधकाम रस्त्याच्या जागेत अतिक्रमण करून असल्याची तक्रार होती. त्याबाबत कोर्टात दावा दाखल करण्यात आला होता होता. कोर्ट आदेश आल्यानंतर पालिकेने कोर्टाच्या आदेशान्वये या ठिकाणी असणाऱ्या बेकायदा घराच्या बांधकामावर हातोडा चालवत हे बांधकाम अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाडले. 

     मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे प्रमुख संजय शेळके व इतर पालिका कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. कोर्ट आदेशान्वये अशाप्रकारे बेकायदा बांधकाम पाडण्यात आल्याने बेकायदा बांधकाम धारकांमध्ये खळबळ उडाली आहे.