शिवप्रहार न्यूज- Dysp संदीप मिटके यांना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे हस्ते "सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार" प्रदान…
Dysp संदीप मिटके यांना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे हस्ते "सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार" प्रदान…
( प्रतिनिधी) :- श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना दि.२६ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे हस्ते "सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे.Dysp संदीप मिटके यांनी तोफखाना पोलीस ठाणे अंतर्गत गु.र.न.456/2018 भा द वि कलम 376( अ),( ब),354,323,506,34, पोक्सो अधिनियम.कलम 5( एम), 6, व 17 या गुन्ह्याचा सर्वोत्कृष्ट तपास केला होता या गुन्ह्याची महाराष्ट्र राज्यात जानेवारी 2021 महिन्यासाठी च्या सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती या कामगिरी करता त्यांना पोलीस महासंचालक यांचे प्रशस्तिपत्र व 25 हजार रुपये रोख अशा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अहमदनगर पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
तोफखाना पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याचा प्राथमिक तपास PSI विशाल सनस यांच्याकडे होता.सदर गुन्ह्याचे गांभीर्य व संवेदनशीलता ओळखून पुढील तपास Dy.s.p संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी सदर गुन्ह्याचा कायदेशीर तपास पूर्ण करूनआरोपी विरुद्ध मा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणात मा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपी क्र. 1 अफसर लतिफ सय्यद यास भादवि का कलम ३७६( ए) ( बी),३५४ बी,३२३ बालकांचे लैंगिक अत्याचाराचे संरक्षण कायदा ( पॉक्सो)२०१२ चे कलम (एम),६,८ व१० प्रमाणे दोषी धरले आणि 20 वर्षे सक्तमजुरी व ५००००रु दंड* दंड न भरल्यास 1वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली सदर दंडाची रक्कम पीडित मुलीस नुकसान भरपाईपोटी देण्याचे आदेश पारित केले तसेच आरोपी क्रमांक 2) मुन्नी उर्फ शमीना सय्यद वय 52 वर्ष रा.भराड गल्ली मीरा वली बाबा दर्गाजवल तोफखाना जि.अहमदनगर बालकांचे लैंगिक अत्याचारापहोती. संरक्षण कायदा (पोस्को 2012 चे 17 व 21 प्रमाणे दोषी धरुन एक महिना साधी कैद (प्रत्येकी) 500/-दंड व दंड न भरल्यास 10 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते Dyspसंदीप मिटके ,API शिशिर देशमुख ( परभणी येथील तपासा बद्दल), ASI राजू भालसिंग, PC याकूब पठाण इत्यादींना सन्मानित करण्यात आले.