शिवप्रहार न्यूज-बहुचर्चित “बजरंगनगर नामकरण”ठराव श्रीरामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर…

बहुचर्चित “बजरंगनगर नामकरण”ठराव श्रीरामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर…
श्रीरामपूर- वार्ड नंबर सात मधील बेलापूर रोडवरील दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसराला या मंदिरावरुन “बजरंगनगर” हे नाव देण्याची मागणी सन 2017 पासून या भागात राहणाऱ्या नागरिकांनी नगरपालिकेकडे केली होती. अनेक वेळेस हा विषय सर्वसाधारण सभेमध्ये आला.परंतु काही जणांच्या विरोधामुळे तो मंजूर होऊ शकला नव्हता.
शिवप्रहार प्रतिष्ठान,श्रीरामपूर(उत्तर नगर) च्या वतीने स्थानिक हिंदु समाजाच्या व हनुमान भक्तांच्या “बजरंगनगर”या मागणीचा पाठपुरावा नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याकडे गेल्या काही दिवसापासून चालू होता. त्याचा परिणाम म्हणुन आज सोमवार 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सोळा नगरसेवकांच्या सह्यांनी हा ठराव मंजूर करण्यात आला.
नगरसेवक राजेंद्र पवार, रवी पाटील,राजेश अलघ यांनी “जय बजरंग बली”चा जय जयकार करत “बजरंगनगर” नामकरणासाठी आग्रही भूमिका मांडली. तर उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेवक मुजफ्फर शेख,नगरसेवक मनोज लबडे यांनी “बजरंगनगर” नामकरणला विरोध केला.
नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी हा ठराव मंजूर करण्यासाठी पुढाकार घेतल्याने “बजरंगनगर” भागातील हिंदू समाज,स्थानिक नागरिक व हनुमान भक्तांकडून त्यांच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.