शिवप्रहार न्यूज- राज्यामध्ये बंदी असलेल्या गोवंश जातीच्या जनावरांची श्रीरामपूर शहरामध्ये वाहतुक करणा-या आरोपीनां रु.१,९७,०००/ किमतीचे मुद्देमालासह अटक

शिवप्रहार न्यूज- राज्यामध्ये बंदी असलेल्या गोवंश जातीच्या जनावरांची श्रीरामपूर शहरामध्ये वाहतुक करणा-या आरोपीनां रु.१,९७,०००/ किमतीचे मुद्देमालासह अटक

श्रीरामपूर (प्रतिनिधी) राज्यामध्ये बंदी असलेल्या गोवंश जातीच्या जनावरांची श्रीरामपूर शहरामध्ये वाहतुक करणा-या आरोपीनां रु.१,९७,०००/ किमतीचे मुद्देमालासह अटक करण्यात

आली असून एसपी मनोज़ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली.

         याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २९/०३/ २०२२ रोजी पोनि/अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा,

अहमदनगर यांना गुप्तबातमीदारा मार्फत गोपनिय माहिती मिळाली की, श्रीरामपूर येथील एक इसम टाटा एसी क्रमांक एमएच /३९/ डब्लु / १३४ ही मधुन महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करण्यास मनाई असतांना जिवंत जनावरांना अमानुषपणे वागणुक देवून त्यांना विना चारा पाण्याचे ताब्यात ठेवून त्यांची कत्तल करणेसाठी बाबरपुरा चौक, वॉर्ड नं. २, ता. श्रीरामपूर येथन वाहतुक करणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके, स्थागुशा, अ.नगर यांनी पोसई/ सोपान गोरे, पोहेकॉ/विजय वेठेकर, बबन मखरे, दत्ता हिंगडे, पोना/सचिन आडबल, शंकर चौधरी, पोकॉ/सागर ससाणे व चालक पोहेकॉ/बबन बेरड असे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथकाची नेमणुक करुन बातमीतील बाबरपुरा चौक, वॉर्ड नं. २, ता. श्रीरामपूर या ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले.

         या सुचनेप्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे जावून तेथील नेमणुकीचे पोना/कारखिले यांना बातमीतील हकिगत समजावून सांगितली, त्यांनी लागलीच दोन पंचांना बोलावून घेवुन त्यांना सदर बातमीतील हकिगत समजावून सांगुन पंचनामा करणे कामी हजर राहण्याची विनंती केल्याने पंचांनी त्यास सहमती दर्शवली, नमुद ठिकाणी बाबरपुरा चौक, पाण्याचे टाकी जवळ, वॉर्ड नं.२, श्रीरामपूर येथे सापळा लावला असता पाटाकडुन येणारे रस्त्याने एक टाटा एसी छोटा टेम्पो येतांना दिसला त्यास थांबण्याचा इशारा करुन थांबविले असता सदर टेम्पोमध्ये दोन इसम व पाठीमागे दाटीवाटीने भरलेली जिवंत लहान मोठी एकुण ०९ जनावरे दिसली. टेम्पोमधील दोन्ही इसमांकडे जनावरांबाबत विचारपुस करता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी जनावरे कत्तल करण्यासाठी घेवून जात आहे असे सांगितले. 

        त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी १) बुंदी ऊर्फ मोहसिन इसाक कुरेशी, वय ३२, रा. कुरेशी मोहल्ला, वॉर्ड नं. २, ता. श्रीरामपूर व २) निसार इक्बाल कुरेशी, वय ४३, रा. पाण्याचे टाकीजवळ, ता. श्रीरामपूर (वाहन चालक) असे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष आरोपी व जिवंत लहान-मोठी ०९ जनावरे व एक टाटा कंपनीचा टेम्पो असा एकुण१,९७,०००/-रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे आरोपी मुद्देमालासह हजर करुन गु.र.नं. ॥ २२९/२०२२ महाराष्ट्र पशु संवर्धन (सुधारणा) अधिनियम कलम ५ (अ) व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे. 

        सदरची कारवाई मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.