शिवप्रहार न्यूज- टाकळीभान टेलटॅंक परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या रमेशचा बुडून मृत्यू...

शिवप्रहार न्यूज- टाकळीभान टेलटॅंक परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या रमेशचा बुडून मृत्यू...

टाकळीभान टेलटॅंक परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या रमेशचा बुडून मृत्यू...

श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान या गावामध्ये असलेल्या प्रवरा कालव्यावरील टेल टॅंक परिसरामध्ये मासेमारी करताना एका तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

      रमेश देवराम सुरसे,वय पंचवीस वर्ष,राहणार -टाकळीभान हा तरुण रविवार असल्याने त्याच्या मित्रांसह टाकळीभान कालव्याच्या परिसरात मासेमारीसाठी गेलेला होता.त्यावेळी टेलटॅंक मधून कालव्यात पाणी सोडण्यासाठी बनवलेल्या सिमेंटच्या पाइपच्या मोरीमध्ये पडून रमेश याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

         याप्रकरणी दत्तू लक्ष्मण गांगुर्डे,वय 20 वर्ष यांनी खबर दिल्यावरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक 40/2021 प्रमाणे नोंद घेण्यात आली आहे.

         या वेळी पोलीस उपनिरीक्षक श्री.बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच पोलीस हवालदार शेख हे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.